Home बातम्या जनता दल युनायटेड १५ जागा लढवणार

जनता दल युनायटेड १५ जागा लढवणार

0

जनता दल युनायटेडच्या गोवा शाखेने दि. ३ मार्च रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत १५ उमेदवार उभे करण्याचे ठरविले असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जावेद रझा यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पणजी, वास्को व केपे या तीन मतदारसंघांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली.

पणजीसाठी डॉमनिक सावियो फर्नांडिस, वास्को – ऍड. ग्लेन डिसोझा व केपे मतदारसंघात आलेक्सी फर्नांडिस यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाल्याचे त्यांनी सांगितले. श्री. रझा यांनी, पक्षाचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाईल.निवडणुकीतील जय पराजय याचा पक्षाने आजच्या घडीस विचार केलेला नाही, असे सांगून सध्याच्या निवडणूक पद्धतीत बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणुकीसाठीचा सर्व खर्च सरकारनेच करावा, अशी रझा यांची मागणी आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. एम. पी. नालगौडा व प्रदेश अध्यक्ष जॉन फिलीप परेरा उपस्थित होते.