कळंगुट, बागा व सिकेरी समुद्रकिनार्यावरील दृष्टीच्या जीवरक्षकांनी सात महाराष्ट्रीय अधिकार्यांना समुद्रात बुडण्यापासून वाचवले. यातील नागपूरच्या पराग कवळे (३९) याला तर दृष्टीचे अधिकारी शिंदे यांनी मृत्यूच्या दाढेतून प्राणवायूचे डोस देत बाहेर काढले. बागा येथे समुद्रात बुडताना सर्वण कुमार, पुणे (३८), याला जीवरक्षक संतोष पाटील याने, रुपेश पाटील (२३), रोहन रेपाळ (२३), विवेक फडके (२४) सर्व मुंबई यांना जीवरक्षक रुपेश गावस व पर्यवेक्षक विठ्ठल च्यारी यांनी वाचवले.
सिकेरी येथील समुद्रात अनिल राचिक (२८) पुणे, याला जीवरक्षक विवेक गावकर व महादेव उसापकर यांनी तर मुंबईतील अभिषा केरी (३७) हिला संजय यादव या जीवरक्षकाने वाचवले.