Home बातम्या नायजेरियन खूनप्रकरणातील संशयितांना १४ दिवसांची कोठडी

नायजेरियन खूनप्रकरणातील संशयितांना १४ दिवसांची कोठडी

0
ओबोदे उझोमा सिमोन (३०) या नायजेरियन युवकांच्या खूनप्रकरणी मंगळवारी अटक केलेल्यांना काल सकाळी म्हापसा न्यायालयासमोर उभे केला असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. यापूर्वी अटक केलेल्या सुरेंद्र पळ याला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले त्यावेळी त्याला परत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

ओबोदो सिमोन या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी आजपर्यंत पाच संशयिताना अटक केली आहे. म्हापसा पोलीस काल (दि. १९) या खूनप्रकरणातील संशयित आरोपी ओंकार पालयेकर, प्रज्योत दाभोलकर व प्रयाग पालयेकर उर्फ नाटको हे शापोरा येथील राहणारे काल धुळेर म्हापसा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून धुळेर येथील सेंट अँथनी हायस्कूलसमोरच्या संकल्प इस्पितळाजवळ त्याना अटक केली.