पहिली एफडीआय
जेट एअरवेजने आपले २४ टक्के समभाग रु. २०६९ कोटींना अबुधाबी येथील इतिहाद कंपनीला विकण्याच्या करारास अंतिम स्वरूप दिले. या कराराने भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात शुभारंभी थेट विदेशी गुंतवणुकीचा पहिला सौदा झाला आहे. भारतीय विमान कंपनीने विदेशी विमान कंपनीशी भागिदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कायदेशीर आवश्यकतेनुसार ५१ टक्के समभाग जेट आणित्याचे चेअरमन नरेश गोयल यांच्याकडे राहतील. दोन्ही कंपन्यांमधील करारानंतर इतिहाद एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स होगन व मुख्य वित्त अधिकारी यांना संचालक मंडळावर नेमण्यात आले. यासंबंधी बैठक काल मुंबईत झाली.