Home बातम्या खरपालच्या बेपत्ता विवाहितेचा कुजलेला मृतदेह आढळला

खरपालच्या बेपत्ता विवाहितेचा कुजलेला मृतदेह आढळला

0

काही दिवसांपूर्वी खरपाल येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह येथील तिळारी प्रकल्पाच्या कालव्याकडे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई यांनी सांगितले.

मयत विवाहितेचे नाव मनीषा मसो गावस (२६) असून ती दि. १६जूनपासून बेपत्ता होती. तशी तक्रार तिच्या पतीने नोंदविली होती.

याप्रकरणी तपास करणार्‍या डिचोली पोलिसांना काल तिचा मृतदेह तिळारी कालव्यानजीकच्या साईबाबा मंदिराकडे जाणार्‍या पायवाटेकडे बाटल्या व शेणाच्या थराखाली सापडला. तो कुजलेल्या स्थितीत होता.

दरम्यान, मनीषाचे लग्नी होऊन केवळ चार वर्षेच झाल्याने पंचनामा डिचोलीच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.