Home बातम्या कांदोळीत वेश्याव्यवसाय उघडकीस

कांदोळीत वेश्याव्यवसाय उघडकीस

0

रशियन महिलेसह चौघांना अटक

सहा लाख रु. जप्त

कांदोळी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत वेश्याव्यवसायाचा भांडाफोड करताना चौघांना अटक करण्यात आले असून पैकी एक रशियन महिला आहे.

सविस्तर वृत्तानुसार कळंगुट पोलीस निरीक्षक शुक्रवारी पहाटे ५ वा. कांदोळी सीम येथे गस्तीवर गेले असता एक महिला व दोन युवक रस्त्यावर भांडत असल्याचे त्यांना आढळले त्या तिघांनाही पोलीस स्टेशनवर आणून चौकशी केली असता सदर महिला वेश्या व्यवसाय करणारी असून दोन युवक तिचे साथीदार असल्याचे समजले. त्यानंतर केलेल्या कारवाईत या वेश्या व्यवसायामागील व्हेलेंटिना शोल (२९) या रशियन महिलेस व तिचा पती मूळ राजस्थान येथील अली उल्ला (३१) यांना अटक करण्यात आली. शिवाय अन्य दोघे अनंत सौरभ देहल (२६), दिल्ली व एरित (२२) बेंगलोर यांनाही अटक करण्यात आली आहेत. शिवाय पोलिसांनी भारतीय व विदेशी चलन मिळून ६ लाख ८८ हजार रोकड व अन्य सामानही जप्त केले.