परवा महाराष्ट्राच्या मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी काल गोव्यातील सचिवालय, विधानसभा भवन व अन्य महत्त्वाच्या इमारतींची तपासणी करण्यासंबंधी अग्नीश्यामक दलाला ‘एडव्हायजरी’ पाठविली असून त्यामुळे अग्नीशामक दलाने वरील इमातींची तपासणी करण्याचे ठरविले आहे.
येथील विधानसभा व सचिवालय तसेच अन्य सरकारच्या इमारतीची देखभाल सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केली जाते. सर्व इमारतींची तपासणी करणार असल्याचे अग्नीशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनी सांगितले.
याबाबतीत जागृती करणे आवश्यक असल्याने ‘मोकड्रिलही करण्याचा विचार मेनन यांनी व्यक्त केला.