27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

  • डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर)

या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य बिघडेल. चुकीची माहिती धोकादायक ठरू शकते. म्हणूनच शंका असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जागतिक महामारीच्या काळातही टीबी रूग्णांना घरी आवश्यक उपचार देऊन केंद्र व राज्य सरकारने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. हे अतिशय महत्त्वाचे होते, कारण फुफ्फुसाचा टीबी आणि कोविड-१९ हे दोन्ही प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतात. या क्षणी देशात कोविड-१९ लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. टीबी रुग्णांमध्येही (तसेच आरोग्याच्या इतर परिस्थितींसह) लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. कोविड-१९ लसीकरणाचा हेतू कोरोना व्हायरस विरोधात लढण्यास आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे होय. या लसीच्या दुष्परिणामांबद्दल काही लोकांच्या मनात भीती आहे की लसीकरणामुळे त्यांच्या पूर्वीची आरोग्याची स्थिती आणखी बिघडू शकते. त्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य बिघडेल. चुकीची माहिती धोकादायक ठरू शकते. म्हणूनच शंका असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वाभाविकच संक्रमणाशी लढण्यासाठी सक्षम असतेच. तरीदेखील साथीच्या काळात जेव्हा संसर्गाचे प्रमाण अधिक असते अशा वेळी आपल्या शरीराला त्या संसर्गाशी लढा देण्यासाठी काही प्रमाणात आधाराची गरज असते. विशेषत: क्षयरोगाच्या संदर्भात रोगास कारणीभूत असणारे जीवाणू फुफ्फुसात संसर्ग निर्माण करतात आणि श्वास घेण्यास जबाबदार असलेल्या पेशी हळूहळू नष्ट करतात. रोगास आवश्यक प्रतिकार करण्याची शक्ती ही लसीकरणाद्वारे नक्कीच मिळू शकते. रोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच रोगाशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारक्षमता या लसीकरणाद्वारे प्राप्त करता येऊ शकते. जेव्हा लसीकरणाच्या दोन किंवा अधिक डोसांचा सल्ला दिला जातो तेव्हा दीर्घ प्रतिरोधक प्रतिसादाची खात्री करणे आणि संसर्गामुळे उद्भवणारी तीव्रता आणि गुंतागुंत कमी करणे हा मुळ उद्देश असतो. अशाप्रकारे टीबीच्या रुग्णांनी (तसेच इतर गुंतागुत असणार्‍या रुग्णांनी) कोविड-१९ संसर्गाबाबत भीती न बाळगता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, स्वच्छता राखणे इत्यादी सर्व शिफारशी पाळल्या पाहिजेत. शक्य असल्यास सुरक्षित राहणे चांगले.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

विरुद्ध अन्न आणि त्याचे दुष्परिणाम

डॉ. स्वाती अणवेकरम्हापसा आयुर्वेद सांगते की दूध आणि दुधाचे पदार्थ हे मासे, अंडी, डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे ह्यांसोबत...

सॉरी…!

॥ बायोस्कोप ॥ प्रा. रमेश सप्रे संकल्प करायचा सकाळी उठल्यावर - आज कमीत कमी वेळा...

हृदयरोगी व रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी

डॉ. मनाली म. पवारसांतइनेज- पणजी उच्चरक्तदाबामध्ये रक्तातील आम्लता वाढते. त्यामुळे क्षारीय पदार्थ खावेत. मेथी, गाजर, केळे. सफरचंद, पेरू,...

‘स्वस्तिक’ ः मांगल्याचे प्रतीक

योगसाधना - ५०४अंतरंग योग - ८९ डॉ. सीताकांत घाणेकर आपल्यातील प्रत्येकाला भगवंताचे अस्तित्व अभिप्रेत आहे...

प्राणशक्ती वाढवण्याची गरज

डॉ. मनाली म. पवारसांतइनेज- पणजी तुळशीच्या पानांचा ५-१० ग्रॅम रस, गायीच्या तुपातून चाटल्यास २-३ दिवसात न्युमोनियासारख्या आजारात आराम...