संपुर्ण गोवा राज्यात ईद उत्सव येत्या शनिवार दि. २७ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार असल्याचे असोसिएशन ऑफ ऑल गोवा मुस्लिम जमातस् या संघटनेने कळविले आहे. या संघटनेचे अध्यक्ष शेख बशीर अहमद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
हिलाल कमिटी ऑफ गोवा यांनी २७ रोजी ईद उत्सव होणार असल्याचे जाहीर केले असल्याचे या पत्रकात नमूद केले आहे.