कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावरील बलात्कार व अपहरणाचा आरोप सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावला. याचिकादार किशोर समरिते यांची त्यासंदर्भात जी सीबीआय चौकशी सुरू आहे, ती सुरूच राहील असा निवाडाही सर्वोच्च न्यायालयाने दिला व याचिकादाराला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला.
समरिते यांनी राहुल यांच्यावर ते अमेठी दौर्यावर आले असताना सहा मित्रांसह एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ही याचिका गैर हेतूने प्रेरित असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे.