एक कोरोना संशयित गोमेकॉत दाखल

0
193

 

बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलच्या कोरोना आयझोलेशन वॉर्डात कोरोना संशयित एका  रुग्णाला काल दाखल करण्यात आले. तर, गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १७८ नमुने नकारात्मक आहेत.

गोमेकॉच्या खास कोरोना वॉर्डात एकूण ८ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तर, आरोग्य खात्याने १४ जणांना क्वारंटाईन केले आहे.

गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत ११८ नमुने तपासणीसाठी काल पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेकडून १७८  नमुन्यांचे  अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. तर, ६९  नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.  सरकारी क्वारंटाईऩखालील व्यक्तीची संख्या ८८ वर पोहोचली आहे. कोरोनाबांधीत बरे झालेल्या सहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकाला सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आला आहे.