Home बातम्या बडतर्फीचा आदेश नाही : देसाई

बडतर्फीचा आदेश नाही : देसाई

0

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या बडतर्फीसंदर्भात कोणतेही आदेश शिक्षण संचालकांना दिले नसल्याचे स्पष्टीकरण काणकोण येथील एका विद्यालयातील शिक्षक अशोककुमार देसाई यांनी दिले आहे. आपल्या बढतीमध्ये अडथळा आणण्यासाठीच आपल्याविरूद्ध कुभांड रचले असल्याचा दावा श्री. देसाई यांनी केला आहे.

शिक्षण खात्याकडून आपल्या शाळेच्या व्यवस्थापनाला बडतर्फीसंदर्भात कोणताही आदेश आलेला नसून हितशत्रुंकडून आपल्याला नाहक बदनाम करण्यात येत असल्याचे श्री. देसाई यांनी म्हटले आहे.