गोवा राज्य माहिती आयुक्तपदी डॉ. प्रदीप पडवळ यांची निवड करण्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला व डॉ. पडवळ यांना प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी नोटिसा पाठविण्याचा आदेश दिला आहे.
ऍड्. आयरिश रॉड्रिग्स यांनी डॉ. पडवळ यांना न्यायालयीन कामकाजाचे ज्ञान नसल्याचा दावा करून त्यांच्या निवडीस वरील न्यायालयात आव्हान दिले होते.