Home बातम्या दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना नव्या कंपनीकडे

दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना नव्या कंपनीकडे

0

आरोग्य सेवा संचालनालयाने १ जून पासून दीनदयाळ स्वास्थ्य सेवा विमा योजनेची अंमलबजावणी टीपीए पॅरामाऊंट हेल्थ सर्व्हिसेस ऍँड इन्शुरन्स टीपीए प्रा. लिमिटेड मार्फत नव्याने सुरू केली आहे. ३१ मे २०१८ पर्यंतचा रुग्णांच्या उपचाराचा खर्च युनायटेड इन्शुरन्स कंपनीने संबंधित इस्पितळांना फेडला आहे. १ जून २०१८ पासून रुग्णांच्या उपचार खर्चाचे दावे आरोग्य सेवा संचालनालय मंजूर करणार आहे, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली.

ही आरोग्य विमा योजना अधिक मजबूत आणि फायदेशीर बनविण्यासाठी नवीन उपाय हाती घेण्याबाबत अभ्यास सुरू आहे. राज्य सरकारने १ सप्टेंबर २०१६ पासून सुरू केलेल्या दीनदयाळ स्वास्थ्य सेवा विमा योजनेखाली राज्यातील सुमारे २ लाख ४१ हजार कुटुंबांचा समावेश आहे. या योजनेखाली सरकारी आणि खासगी मिळून ४१ इस्पितळे आणि राज्याबाहेरील १० इस्पितळांत आरोग्य सेवा घेण्याची सोय उपलब्ध आहे. रुग्णांची इस्पितळाबाबत कोणतीही तक्रार असल्यास १८००२३३२५६८, ०८३२-२४३८८४४, ८४३३९२३१७६ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.