Home बातम्या ड्रग्ज व्यवहार प्रकरणी रॉय नाईकला समन्स

ड्रग्ज व्यवहार प्रकरणी रॉय नाईकला समन्स

0

गुन्हा अन्वेषण विभागाने राजकारणी – पोलीस – ड्रग्स माफिया प्रकरणाच्या तपासासाठी माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक याला २९ जून रोजी सकाळी ११ वाजता रायबंदर येथील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी काल समन्स बजावला आहे.

गोवा विधानसभेच्या राजकारणी-ड्रग्स माफिया प्रकरणी नियुक्त सभागृह समितीच्या अहवालाला अनुसरून रॉय नाईक याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोवा विधानसभेने तत्कालीन आमदार मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी सभागृह समितीची नियुक्ती केली होती. समितीने ऑक्टोबर २०१३ मध्ये अहवाल सादर केला. या समितीने या प्रकरणी चौकशी करून या प्रकरणात रॉय नाईक, पोलीस खात्यातील अधिकारी गुंतल्याचे अहवालात म्हटले होते. हा अहवाल चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या समितीने तयार केलेल्या अहवालाला विष्णू वाघ आणि मायकल लोबो या दोन सदस्यांनी पूर्णपणे मान्यता दिली नव्हती.