Home Featured कंटेनरखाली सापडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कंटेनरखाली सापडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

0

पत्रादेवी-पेडणे येथे काल सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका 65 वर्षीय नागरिकाला कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नारायण सहदेव सावळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर माहितीनुसार, नारायण सावळ हे नेहमीप्रमाणे काल सकाळी देखील मॉर्निंग वॉकला निघाले होते. पत्रादेवी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने चालत असताना एमएच 12 व्हीटी 7048 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना चिरडले.
हा अपघात झाल्यानंतर चालकाने कंटेनरसह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची माहिती मोपा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी अपघातास कारणीभूत कंटेनरचा शोध घेतला असता, रत्नागिरी लांजा या परिसरात सापडला. पोलिसांनी तो कंटेनर ताब्यात घेतला. चालक मोहम्मद अजीम खान (25, रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध मोपा पोलिसांनी मोटर कायद्याच्या 281, 106(1) 134 ए बी या कलमांखाली गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, अपघातात ठार झालेले नारायण सावळ हे वास्को येथील कंपनीतून निवृत्त झाले होते.