गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 13 मार्च ते 9 एप्रिल 2026 या काळात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या रविवार दि. 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता पर्वरी येथे मंडळाच्या सभागृहात जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल वेबसाईट आणि डिजिलॉकर ॲपवर उपलब्ध केला जाणार आहे. राज्यभरातील 32 केंद्रांतून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला नियमित 20,659 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात 10819 मुले आणि 9840 मुलींचा समावेश होता. 28 एप्रिलपासून स्कूल लॉगईनवरून विद्यार्थी गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतात. वर्ष 2025 च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.35 टक्के लागला आहे.