Home बातम्या स्वतंत्र ‘आयुष’खात्याची स्थापना

स्वतंत्र ‘आयुष’खात्याची स्थापना

0

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुष या स्वतंत्र खात्याची स्थापना करणारी अधिसूचना काल जारी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात योग, आयुष, आयुर्वेद शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी आयुष या स्वतंत्र खात्याची स्थापना करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली. नवीन आयुष खात्याकडून राष्ट्रीय आयुष अभियान, रुग्णालये, आरोग्य केंद्रे, योग, निसर्गोपचार, पंचकर्म, शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय आरोग्य पर्यटन या कामांच्या अंमलबजावणीचे काम पाहणार आहे. सध्या, राज्यात आयुष विभागाचे काम आरोग्य खात्याकडून चालविले जात आहे.