Home बातम्या भाटीकरांच्या याचिकेवरसोमवारी सुनावणी शक्य

भाटीकरांच्या याचिकेवरसोमवारी सुनावणी शक्य

0

काँग्रेस पक्षाचे फोंडा पोटनिवडणुकीतील उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात फोंडा पोटनिवडणूक रद्द केल्या प्रकरणी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सोमवार दि. 27 एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. डॉ. केतन भाटीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यात भारतीय निवडणूक आयोग, गोवा सरकार, मुख्य निवडणूक अधिकारी, प्रितम हरमलकर आणि अंकिता कामत यांना प्रतिवादी केले आहे.