Home बातम्या अजमेर येथे बस कोसळूनदोघांचा मृत्यू, 28 जखमी

अजमेर येथे बस कोसळूनदोघांचा मृत्यू, 28 जखमी

0

अजमेरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस 200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात 28 जण जखमी झाले असून त्यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. पुष्करकडे जाणाऱ्या बसमध्ये 31 प्रवासी होते. ते अजमेर येथे मायरा भरण्यासाठी जात होते. यावेळी पुष्करच्या घाटात बस अनियंत्रित झाली. हा अपघात पुष्करपासून सुमारे 3 किलोमीटर आधी रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झाला.