Home बातम्या राजीव गांधी पंचायत राजच्याअध्यक्षपदी प्रवीण ब्लेगन

राजीव गांधी पंचायत राजच्याअध्यक्षपदी प्रवीण ब्लेगन

0

राजीव गांधी पंचायती राज संघटन गोवाच्या अध्यक्षपदी प्रवीण ब्लॅगन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत एक आदेश जारी केला आहे. राजीव गांधी पंचायती राज संघटन ही संस्था विकेंद्रीकरणाला चालना देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि पंचायती राज संस्थांना सक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रवीण ब्लॅगन यांची नियुक्ती गोव्यातील तळागाळातील संघटनात्मक कार्याला नवचैतन्य देणारी ठरेल, असा विश्वास प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी व्यक्त केला आहे