Home बातम्या तीन मजली लॉज कोसळला,मध्यप्रदेशात तिघांचा मृत्यू

तीन मजली लॉज कोसळला,मध्यप्रदेशात तिघांचा मृत्यू

0

मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील कोतमा येथील बसस्थानकाजवळ तीन मजली अग्रवाल लॉज कोसळला. या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांना शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. अद्यापही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले आहेत. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यात संपूर्ण इमारत कोसळताना दिसत आहे. मृतकांची ओळख हनुमान दीन यादव आणि राम कृपाल यादव यांचा समावेश असून दोघेही चौथ्या मजल्यावर काम करत होते, तेव्हा हा अपघात घडला.