Home बातम्या इराणने अमेरिकेची 2 हेलिकॉप्टरर्स पाडली

इराणने अमेरिकेची 2 हेलिकॉप्टरर्स पाडली

0

इराणने अमेरिकेच्या दोन एफ-15 विमानापाठोपाठ दोन लष्करी मोहिमांसाठी वापरली जाणारी हेलिकॉप्टरर्स पाडली आहेत. अमेरिकेच्या लढाऊ विमानाचा पायलट बचावला होता. त्याचा शोध घेत असलेल्या विमानांपैकी दोन हेलिकॉप्टर्स इराणने टिपली. त्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. इस्फहानच्या दक्षिण भागात अमेरिकन लष्कर आपल्या कोसळलेल्या विमानातील वैमानिकाला वाचवण्यासाठी मोठी मोहीम राबवत होते. याच वेळी इराणच्या हवाई संरक्षण दलाने ही कारवाई केली.

अमेरिकन पायलटची सुटका
अमेरिकन सैन्याने इराणमध्ये घुसून दोन दिवस शोधमोहीम राबवत अखेर आपल्या पायलटची सुरक्षित सुटका केली आहे. अमेरिकन हवाई दलाचे एफ-15 ई विमान शुक्रवारी इराणने पाडले होते. या विमानात दोघेजण होते. पैकी एकाची सुटका अमेरिकेने पुढील काही तासांत केली. पण दुसऱ्याची सुटका करण्यासाठी अमेरिकेला 48 तास लागले. अमेरिकेच्या पायलटला पकडण्यासाठी इराणी सैन्याने ताकद पणाला लावली. पण अमेरिकेने पायलटची सुटका केली.