भाजप सरकार आसाममध्ये समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांनी नलबारी येथील सभेत केली. आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी ही घोषणा केली. याचसोबत चार विवाहांवर बंदी घालणार, राज्यातील घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. नलबारी येथे आयोजित सभेत बोलताना शहा बोलत होते. आसाममध्ये भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी संहिता लागू केली जाईल आणि चार विवाहांवर बंदी घालण्यात येईल असे सांगून शहा यांनी, काँग्रेसने मतांसाठी आसाममध्ये घुसखोरीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला.