Home बातम्या अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यातइराणमध्ये 200 जणांचा मृत्यू

अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यातइराणमध्ये 200 जणांचा मृत्यू

0

मध्य पूर्वेतील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेसोबत इस्रायलनेदेखील इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणच्या 30 ठिकाणांवर हल्ला केला. त्यात अनेक सैन्य ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून 800 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. इस्रायलने इराणवर 1200 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत असा दावा केला आहे.