Home बातम्या इराणचे माजी राष्ट्रपतीमहमूद अहमदीनेजाद ठार

इराणचे माजी राष्ट्रपतीमहमूद अहमदीनेजाद ठार

0

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा चांगलाच भडका उडाला असून यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराणच्या आणखी एका बड्या नेत्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अहमदीनेजाद यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक तसेच अन्य जवळच्या काही व्यक्तींचाही मृत्यू झाला आहे. अहमदीनेजाद यांच्या सुरक्षेसाठी इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे जवान तैनात होते. अहमदीनेजाद हे एका इमारतीत आपल्या टीमसह आश्रयाला होते. याच इमारतीवर हल्ला करण्यात आला.