8 उमेदवारांनी मागे घेतले अर्ज; 23 प्रभागांत सरळ लढत; 6 प्रभागांत तिरंगी, तर एका प्रभागात पंचरंगी लढत
पणजी महानगरपालिकेच्या येत्या 11 मार्च रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 8 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, आता 30 प्रभागात एकूण 69 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. महानगरपालिकेच्या 30 प्रभागांपैकी 23 प्रभागात उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. 6 प्रभागात तिरंगी आणि एका प्रभागात पंचरंगी लढत होणार आहे. पणजी महानगरपालिकेसाठी भाजप पुरस्कृत मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा गट आणि ‘आम्ही पणजीकर’ गटाच्या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.
पणजी महानगरपालिकेच्या 30 प्रभागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रभागनिहाय यादी खालीलप्रमाणे आहे. प्रभाग 1 (अनुसूचित जाती महिला) – दामिनी रघुवीर कुंकळ्येकर, रोशन मार्टिन्स, युतिका झांबांवलीकर. प्रभाग 2 (ओबीसी महिला) – कॅरोलिना पो, उमा उदय वळवईकर. प्रभाग 3 (ओबीसी महिला) – मार्गारेट फर्नांडिस आणि जेन पो. प्रभाग 4 (सर्वसाधारण) : रोहित मोन्सेरात, जॉन पो, आग्नेलो झकारियास सिल्वेरा. प्रभाग 5 (सर्वसाधारण) – सुदिन कामत, किशोर शास्त्री. प्रभाग 6 (ओबीसी) – शीतल नाईक आणि बेंतो लॉरेन सिल्वेस्टर, प्रभाग 7 (सर्वसाधारण) – संजीव देसाई आणि लिओनिड फुर्ताडो. प्रभाग 8 (ओबीसी महिला) – शुभदा रुपेश शिरगावकर आणि करिना राजेश शिरोडकर, प्रभाग 9 (सर्वसाधारण) – सुरेंद्र फुर्तादो आणि माखिजा कबीर फिलिप पिंटो. प्रभाग 10 (सर्वसाधारण) – प्रसाद आमोणकर आणि विष्णू नाईक. प्रभाग 11 (सर्वसाधारण) : तुकाराम चिनावर आणि गौरव नाईक. प्रभाग 12 (सर्वसाधारण) – ब्रिजेश वासुदेव कवळेकर, शबनम खान, वर्षा हरी शेट्ये. प्रभाग 13 (सर्वसाधारण) – नीळकंठ च्यारी आणि उदय वामन मडकईकर. प्रभाग 14 (ओबीसी) – मदन शंभूू फातर्पेकर, प्रज्योत संतोष वायंगणकर. प्रभाग 15 (ओबीसी) – शायनी चोपडेकर आणि सुरज रोहिदास नाईक. प्रभाग 16 (महिला) – अस्मिता केरकर, प्रांजल प्राजित नाईक, प्रभाग 17 (सर्वसाधारण) – डेनिस एडवर्ड फ्रान्सिस जॉर्ज आणि जॅक अजित सुखिजा. प्रभाग 18 (सर्वसाधारण) – आशिष रंगनाथ नागवेकर आणि कृष्णा रामदास शिरोडकर. प्रभाग 19 (महिला) – निकिता नाईक आणि डिओडिता परेरा.
प्रभाग 20 (सर्वसाधारण) – गोविंद चोडणकर, शुभम चोडणकर, महेश जी. रेवणकर. प्रभाग 21 (ओबीसी) – मनीषा मणेरकर, भालचंद्र राजीव तारकर पेडणेकर. प्रभाग 22 (महिला) – नेहा कवळेकर, दीक्षा माईणकर. प्रभाग 23 (महिला) – विद्या सतीश गडकर, ज्योती मसुरकर. प्रभाग 24 (सर्वसाधारण) – शिवदास व्यंकटेश नाईक रायकर, नितीन नार्वेकर आणि करण यतीन पारेख. प्रभाग 25 (महिला) – माधवी सुभाष आमोणकर, कीर्ती साखळकर. प्रभाग 26 (सर्वसाधारण) – वसंत आगशीकर, शुभदा प्रभाकर धोंड, राजेश केळुस्कर, नम्रता सरदेसाई, संजाई सरमळकर. प्रभाग 27 (ओबीसी) – विठ्ठल चोडणेकर, वासुदेव बाळकृष्ण मणेरकर. प्रभाग 28 (सर्वसाधारण) – दत्तराज हळर्णकर, रुपेश हळर्णकर, घनश्याम श्रीकांत नास्नोडकर. प्रभाग 29 (महिला) – सँड्रा मारिया कुन्हा आणि लिब्रेटा मेंडिस. प्रभाग 30 (सर्वसाधारण) – सिल्वेस्टर फर्नांडिस आणि वैभव साळगावकर.