धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख (84) यांचे काल गुरूवारी दि. 12 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने नागपूर येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विवेक इस्पितळात उपचार सुरु होते. आपल्या लेखणी-वाणीतून त्यांनी शिवकथा सर्वदूर पोहोचवली. त्यांनी लिहिलेले शिवरायांचे दोन खंडातील चरित्र शककर्ते शिवराय हा आधारभूत ग्रंथ मानला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.