Home बातम्या आजपासून विद्यार्थीसंसद स्पर्धा सुरू

आजपासून विद्यार्थीसंसद स्पर्धा सुरू

0

पर्वरीतील गोवा विधिमंडळ सचिवालयाने गोवा विधिमंडळ मंचाच्या सहकार्याने दि. 13 ते दि. 21 फेब्रुवारीपर्यंत पीएसी-पीयूसी कक्ष, विधानसभा प्रकल्प, पर्वरी येथे 2025-26 वर्षासाठी विद्यार्थी संसद स्पर्धा आयोजित केली आहे. विद्यार्थी समुदायामध्ये स्वयंशिस्त, अभिव्यक्तीचा अधिकार, इतरांच्या मतांबद्दल सहिष्णुता, सुधारित वादविवाद आणि लोकशाही जीवनशैलीच्या विविध गुणांशी स्वतःला परिचित करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. गोवा राज्यातील एकूण 19 महाविद्यालये विद्यार्थी संसद स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.