Home बातम्या ‘त्या’ गोमंतकीयांना दुहेरीनागरिकत्व द्या : सरदेसाई

‘त्या’ गोमंतकीयांना दुहेरीनागरिकत्व द्या : सरदेसाई

0

भारत सरकारने पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या गोव्यातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व द्यावे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पणजीत पक्षाच्या मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केली. केंद्र सरकारने पोर्तुगीज नागरिकत्व असलेल्या गोव्यातील लोकांसाठी गोव्याचा अद्वितीय इतिहास लक्षात घेऊन एक विशेष धोरण तयार करण्याची गरज आहे. राज्यातील खासदारांनी संसदेत हा विषय मांडून दुहेरी नागरिकत्व मिळवून देण्याची गरज आहे. त्यातूनच पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकीय नागरिकांना ओळख कायम राखता येईल, असेही सरदेसाई म्हणाले.