आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेऊन गोव्यातील अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची विनंती केली आहे. या राजकीय आरक्षणाबाबत संसदेत विधेयक संमत करण्यात आलेले आहे.