पोलीस खात्यातील 19 पोलीस उपअधीक्षकांना पोलीस अधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कार्मिक खात्याने यासंबंधीचा आदेश काल जारी केला. पोलीस अधीक्षकपदी बढती देण्यात आलेल्यांमध्ये शेख सलीम, विल्सन डिसोझा, फ्रान्सिस कोर्त, राय परेरा, नेल्सन रापोसो, ब्राझ मिनेझिस, नूतन वेर्णेकर, गुरुदास कदम, सिद्धांत शिरोडकर, जिवबा दळवी, राजन निगळ्ये, राजेंद्र प्रभुदेसाई, नेल्सन आब्लुकर्क, आशिष शिरोडकर, प्रवीणकुमार वस्त, सागर एकोस्कर, राजेश कुमार, तुषार वेर्णेकर आणि विश्वेश कर्पे यांचा समावेश आहे.