भारतीय जनता पक्षाने आपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणुकीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या. भाजपच्या केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 19 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल आणि 20 जानेवारी रोजी नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल. सध्या भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असलेले नितीन नबीन हेच या पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या विरोधात दुसरा उमेदवार उभा राहण्याची शक्यता कमी असल्याने त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.