Home बातम्या रशियन नागरिकाकडूनदोन महिलांचा खून

रशियन नागरिकाकडूनदोन महिलांचा खून

0

एका रशियन नागरिकाने आपल्याच दोन रशियन मैत्रिणींचा खून केल्याची घटना हरमल आणि मोरजी येथे उघडकीस आली. मधलवाडा-मोरजी येथील पहिल्या घटनेत बुधवारी रात्री 11 च्या सुमारास संशयित अलेक्सेई लिओनोव्ह याने त्याची मैत्रिण एलेना वानिव्हा (37) हिचा धारदार चाकूने गळा कापून खून केला. या प्रकरणी मारिया फर्नांडिस यांनी तक्रार नोंदवली होती. दुसऱ्या घटनेत गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास अलेक्सेई लिओनोव्ह याने मैत्रीण एलेना कास्तानोव्हा (37) हिच्यावर हल्ला करत तिचा खून केला. अलेक्सेई लिओनोव्ह याने ही एलेना कास्तानोव्हा ही राहत असलेल्या हरमल येथील भाड्याच्या खोलीत घुसून तिच्यावर हल्ला केला. यासंबंधीची तक्रार हरमल येथील उत्तम नाईक या रहिवाशाने नोंदवल्यानंतर मांद्रे पोलिसांनी त्वरित धाव घेत संशयिताला अटक केली. तसेच त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.