Home बातम्या बंगळुरूत छाप्याच्या निमित्ताने 7.11 कोटी रुपये लुटले

बंगळुरूत छाप्याच्या निमित्ताने 7.11 कोटी रुपये लुटले

0

बंगळुरूमध्ये काही गुन्हेगारांनी कर विभागातील अधिकारी असल्याचे सांगून एचडीएफसी बँकेच्या एटीएम करन्सी भरणाऱ्या व्हॅनमधून तब्बल 7.11 कोटी रुपये लुटले आणि व्हॅनमधील कर्मचाऱ्यांचे अपहरण केले. सीएमएस कॅश व्हॅन जेपी नगर शाखेतून रोख रक्कम घेऊन जात असताना ही घटना घडली. सदर व्हॅन इनोव्हात असलेल्या गुन्हेगारांनी अडवून कर्मचाऱ्यांना आपण कर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. कागदपत्रांची पडताळणी करण्याचा बहाणा करत गुन्हेगारांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या रोख रकमेसह इनोव्हामध्ये घेतले. त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम काढून घेतली व त्यांना रस्त्यावर उतरवून दरोडेखोर पळून गेले. दक्षिण विभाग पोलिसांनी विशेष पथके तयार करून गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. प्राथमिक तपासात एका संघटित गँगचा यामध्ये सहभाग असल्याचं उघड झालं आहे. येथील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.