वास्को, सांकवाळ आणि कांसावली या रेल्वे विभागादरम्यान लाईन ब्लॉक व पॉवर ब्लॉकचे महत्त्वाचे काम करावयाचे आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम रेल्वेने 18 नोव्हेंबरपासून 45 दिवसांसाठी म्हणजेच 1 जानेवारी 2026 पर्यंत वास्को – कुळे – वास्को ही रेल्वेसेवा पूर्णपणे रद्द केलेली आहे. लाईन ब्लॉक आणि पॉवर ब्लॉकच्या कामांसाठी रेल्वे क्रमांक 56964 (वास्को ते कुळे) आणि रेल्वे क्रमांक 56963 (कुळे ते वास्को द गामा) या दोन्ही रेलगाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत ही वास्को-कुळे-वास्को डेमू रेल्वे रद्द करण्यात आली होती.