Home बातम्या जेनिटोसह इतरांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ

जेनिटोसह इतरांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ

0

मेरशी-पणजी येथील जिल्हा न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोज आणि इतर सात संशयित आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत काल आणखी 14 दिवसांची वाढ केली. आता, या प्रकरणी पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. रामा काणकोणकर यांच्यावर 18 सप्टेंबर रोजी करंजाळे येथे दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून कुख्यात गुंड जेनिटो कार्दोजसह एकूण आठ जणांनी अटक केली आहे. या प्रकरणातील जेनिटोने जामिनासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा न्यायालयाने यापूर्वी फेटाळून लावला होता.