Home बातम्या वन हक्क कायद्याखाली आणखी 57 दावे मंजूर

वन हक्क कायद्याखाली आणखी 57 दावे मंजूर

0

उत्तर गोवा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत वन हक्क कायद्याखाली नवीन 57 दावे मंजूर करण्यात आले. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव (आयएएस) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत वन हक्क कायद्याखाली सत्तरी तालुक्यातील साट्रे आणि भुईपाल गावातील एकूण 81 दावे विचारार्थ घेण्यात आले. त्यातील 57 दावे मंजूर करण्यात आले. 17 दावे वैयक्तिक सुनावणीसाठी ठेवण्यात आले असून, 1 दावा फेटाळण्यात आला आहे. वन हक्क कायद्याखालील 6 दावे सत्तरी उपविभागीयस्तरीय समितीकडे परत पाठविण्यात आले आहेत.