जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे दक्षिण गोव्यातील 11 मतदारसंघात येत्या 13 आणि 14 ऑक्टोबरला मर्यादित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यातील सांगे, केपे, कुडचडे, वेळ्ळी, मडगाव, फातोर्डा, नावेली, नुवे, वास्को, मुरगाव, दाबोळी या मतदारसंघात मर्यादित पाणी पुरवठा केला जाणार आहे, असे पेयजल विभागाने कळविले आहे.