डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदरी निराशा
मारिया कोरिना मचादो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मात्र या पुरस्कारामुळे मी भारत-पाकिस्तान युद्धासह सात युद्धे थांबवली आहेत, त्यामुळे हा पुरस्कार मला मिळावा असे म्हणणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मारिया कोरिना मचादो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 338 उमेदवार रिंगणात होते. यात ट्र्म्प यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यांनी स्वतः नोबेल पुरस्कारावर दावाही केला होता. शांततेच्या नोबेल पुरस्काराबाबत नोबेल समितीने लोकशाही हक्कांसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी, हुकूमशाहीपासून शांततापूर्ण लोकशाहीकडे संक्रमण करण्यासाठीच्या संघर्षासाठी मारिया यांना नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांना आंद्रेस बेलो कॅथोलिक विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि इन्स्टिट्यूटो डी एस्टुडिओस सुपीरियर्स डी ॲडमिनिस्ट्रेसिओनमधून वित्त विषयात पदवी प्राप्त केली. त्या व्हेंटे व्हेनेझुएला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत. 2018 मध्ये बीबीसीच्या 100 सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये आणि 2025 मध्ये टाइम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता.