Home बातम्या कोटी तीर्थ प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्याकडून आढावा

कोटी तीर्थ प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्याकडून आढावा

0

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिवाडी येथील नियोजित कोटी तीर्थ कॉरिडॉर प्रकल्पावर विचारविनिमय करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक काल घेतली. पोर्तुगीज कालखंडात राज्यातील जमीनदोस्त करण्यात आलेल्या हजारो मंदिराचे स्मारक म्हणून दिवाडी येथे कोटी तीर्थ कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकल्पासाठी नियुक्त समिती आणि सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रगतीच्या कामाचा आढावा घेतला. या प्रकल्पासाठी पायाभूत कामे प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.