Home Featured गोवा फॉरवर्डच्या जनसंपर्क मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोवा फॉरवर्डच्या जनसंपर्क मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

दुर्गादास कामत यांचे प्रतिपादन

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राज्यव्यापी जनसंपर्क मोहिमेला राज्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मोठ्या संख्येने लोक येऊन पक्षाचे नेते व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यासमोर आपल्या समस्या मांडू लागलेले आहेत. राज्यातील लोकांना त्यांचे म्हणणे ऐकून घेणारा कोणीतरी विरोधी नेता हवा होता. तो त्यांना विजय सरदेसाई यांच्या रुपाने मिळाला आहे असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस (संघटक) दुर्गादास कामत यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

राज्य जनसंपर्क मोहिमेच्या दरम्यान आम्हाला गोवा समजून घेता आला. राज्यातील लोकांचे प्रश्न समजून घेता आले. राज्यात केवढा बेरोजगार आहे हे समजून आले असल्याचे यावेळी कामत यांनी सांगितले.
लोकांच्या या सगळ्या समस्या व प्रश्न गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे येत्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले.
ही जनसंपर्क मोहीम येत्या 11 जुलैपर्यंत सुरू राहणार असून ती धारबांदोडा, केपे, सांगे, फोंडा व सासष्टी हे पाच तालुके अजून शिल्लक राहिले असल्याची माहिती यावेळी कामत यांनी दिली.