Home बातम्या तीळमात्रही भ्रष्टाचार सहन करणार नाही : पर्रीकर

तीळमात्रही भ्रष्टाचार सहन करणार नाही : पर्रीकर

0

जनतेचा प्रतिसाद पाहून आज आपल्याला शब्द सुचेनासे झाले आहेत असे सांगून पर्रीकर म्हणाले की आज शपथविधी सोहळ्यावेळी जरी आपल्याला गैरसोय सोसावी लागली असली, तरी आमचे सरकार अजून सत्तारूढ झालेले नसल्यानेच ही गैरसोय झाली. आता आपले सरकार सत्तारूढ झाले असून अशी गैरसोय पुन्हा होणार नाही. जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने येत्या काही दिवसांत पूर्ण करू असे पर्रीकर पुढे म्हणाले.

ज्या तर्‍हेने जनतेने आपला कौल दिला आहे, तो पाहाता आपण सद्गदित झालो आहोत असे सांगून पर्रीकर यांनी सुवर्णमयी गोवा घडवूया, त्यासाठी आपला आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहावा असे उद्गार काढले.

आपल्यापाशी काही जादूची कांडी नाही, त्यामुळे आश्वासने पूर्ण करण्यास थोडा अवधी लागेल, परंतु दोन एप्रिलपर्यंत वाट पाहा. पेट्रोल स्वस्त होईल. ज्येष्ठ नागरिकांना दुप्पट मानधन दिले जाईल. सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. जाहीरनामा काढून ठेवा. दरवर्षी आपले सरकार त्यापैकी किती कामे पूर्ण केली आणि किती राहिली याचा हिशेब जनतेला सादर करील असे आश्वासनही पर्रीकर यांनी दिले.