Home Featured ऑक्टोबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ः मुख्यमंत्री

ऑक्टोबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ः मुख्यमंत्री

0

राज्यातील सर्व लोकांचे पुढील ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत दोन्ही डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्याचे सरकारने ठरवले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. राज्यातील ७६ टक्के लोकांना यापूर्वीच लसीचा पहिला डोस देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आणि ३० जुलैपर्यंत उर्वरित २४ टक्के लोकांना लशीचा पहिला डोस देण्यात येईल. ३० जुलैपर्यंत त्यामुळे पहिला डोस घेणार्‍यांचे प्रमाण १०० टक्के एवढे होणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात आतापर्यंत १०.६८ लाख लोकांना पहिला डोस दिल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.