उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसचे जितिनप्रसाद भाजपमध्ये

0
69

उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिनप्रसाद यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे जितिनप्रसाद हे एकेकाळचे अतिशय निकटवर्तीय होते. जितिनप्रसाद आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीही जितिनप्रसाद हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. पण कॉंग्रेस हायकमांडकडून हस्तक्षेप करण्यात आल्यानंतर प्रसाद यांनी त्यावेळी आपला निर्णय मागे घेतला होता. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमधील ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापाठोपाठ जितिनप्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रसाद यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले आहे.