केंद्र सरकारच्या योजनांचाही कोविडबाधितांना लाभ मिळणार

0
121

केंद्र सरकारने कोविडग्रस्तांसाठी ज्या ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, त्या गोव्यातील कोविडग्रस्तांसाठीही लागू होणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय राज्य सरकारने कोविडग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या योजनांचाही राज्यातील कोविडग्रस्तांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोविडने निधन झाल्यास त्या कुटुंबाला २ लाख रुपयांचा सानुग्रह निधी देण्याची घोषणा राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी केली आहे. या योजनेसह केंद्र सरकारच्या योजनांचा देखील राज्यातील कोविडबाधितांना लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दीनदयाळ सामाजिक सुरक्षा व गृह आधार या योजनांचे केवळ एका महिन्याचे पैसे देणे बाकी असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.