Home बातम्या ५ जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता

५ जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता

0

गोव्यात येत्या ५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता काल हवामान खात्याने व्यक्त केली आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे उद्या दि. ३१ मेपर्यंत आगमन होण्यास अनुकूल असे वातावरण तयार झाले असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच गोव्यात आज दि. ३० व उद्या दि. ३१ मे असे दोन दिवस ठिकठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे केरळमध्ये साधारणतः १ जून रोजी आगमन होत असते. तर गोव्यात त्याचे आगमन ५ जून रोजी होत असते.