काणकोणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्या एका कारने दोन ठिकाणी दोन दुचाकींना धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. सदर कारने शिर्ली येथे एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. मात्र तिकडे दुर्लक्ष करून कारचालक पुढे गेला व त्याने सार्जोरा येथे आणखी एका दुचाकीला धडक दिली. या अपघातातही सदर दुचाकीचालक जखमी झाला. या दोन अपघातप्रकरणी कारचालक रणजित देसाई याला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली. या अपघातात शिर्ली येथे घडलेल्या घटनेतील दुचाकीचालक दिलीप चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना इस्पितळात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर सार्जोरा येथील अपघातात जखमी झालेले नीलेश गावकर यांना बाळ्ळी आरोग्य केंद्रात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.