राज्यातील वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचार्यांसाठी लागू करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे येत्या ३० मेपर्यंत वाढविण्यात आली आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा फैलाव कायम असल्याने मार्गदर्शक तत्त्वाच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कर्मचार्यांची गर्दी होऊ नये म्हणून ५० टक्के कर्मचार्यांसह कामकाज करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. कर्मचार्यांची तीन पाळ्यांत विभागणी करून कार्यालयातील कामकाज हाताळले जात आहे.