Home Featured गोमेकॉत ड्युरा सिलिंडरची व्यवस्था करणार ः मुख्यमंत्री

गोमेकॉत ड्युरा सिलिंडरची व्यवस्था करणार ः मुख्यमंत्री

0

बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ड्युरा सिलिंडरची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
गोमेकॉला प्राणवायू सिलिंडरच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. योग्य प्रमाणात प्राणवायू सिलिंडरच्या अभावामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्राणवायू पुरवठ्याच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी ड्युरा सिलिंडरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रत्येक ड्युरा सिलिंडरची क्षमता २८ जम्बो सिलिंडर एवढी आहे. या सिलिंडरमध्ये प्राणवायूऐवजी एलएमओ भरण्यात येणार आहे. प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.